-->
वडगाव निंबाळकर मध्ये आदर्श उपक्रम.....          डॉक्टर सेवेसाठी मोलाचे योगदान.....             सामाजिक कार्यकर्ते करतात योग्य दिशेने वाटचाल ...

वडगाव निंबाळकर मध्ये आदर्श उपक्रम..... डॉक्टर सेवेसाठी मोलाचे योगदान..... सामाजिक कार्यकर्ते करतात योग्य दिशेने वाटचाल ...

 बारामती : (वडगाव निंबाळकर )@सुनील जाधव बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर हे गाव बाजारपेठ,दळणवळण याचे दृष्टीने सर्वात मोठे व सोयीस्कर असून या गावात नवनवीन योजना,उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सर्वांनी विचार करायला लावणार असा उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आला. वडगाव मध्ये बरेच हॉस्पिटल आहेत परत काही कारणाने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय व्हायची त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. परंतु कंपनी बॉईज संघटना सामाजिक कार्यकर्ते युवा पिढी या यावर उपाय म्हणून नियोजन केले.आणि आज भरवली ग्रामपंचायत मध्ये सरपंच डॉक्टर आणि ग्रामस्थ यांची सभा आणि झाली ना मंजुरी सर्वांनी केले ना मान्य सर्व डॉक्टर लोकांनी ग्रामस्थांच्या विचारांना व उपक्रमाला मान्यता दिली आठवड्यातील एक दिवस प्रत्येकाने वार घेतला वाटून  24 तास सेवा देण्याचे केले मान्य यामुळे सर्व ग्रामस्थांना याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर या उपक्रमाचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच देण्यात आले. यानंतर वडगाव निंबाळकर स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळे समोरील वॉल कंपाऊंड चे भूमिपूजन करण्यात आले व शाळेतील स्वच्छता बाबत चर्चा करण्यात आली.. यावेळी गावातील  समस्त ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच सुनील ढोले,माजी सरपंच संजय साळवे, नागेश जाधव अध्यक्ष भटके-विमुक्त हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र, विक्रम साळवे,अण्णा भोसले,राहुल आगम,अक्षय छोटू जाधव,भाऊ आगम,अभिजीत साळवे,सौरभ दरेकर, सुरज दरेकर, भूषण दरेकर, उदय हिरवे,सुनील खोमणे, चंद्रकांत बालगुडे,राजेंद्र बोडरे, सुनील जाधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले. यावेळी वडगाव निंबाळकर मधील डॉक्टर- शहा, चव्हाण, खोत,जगताप,कोकरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.       असा असेल दिनक्रम आणि रात्रीच्यावेळी रुग्णसेवा मिळणेबाबत..              डॉ.दशरथ ठोंबरे -शुक्रवार     डॉ. सुनील जगताप -सोमवार डॉ. उमेश शहा- शनिवार डॉ.प्रविण कोकरे -मंगळवार डॉ.चेतन जगताप -गुरुवार डॉ.अशोक चव्हाण -बुधवार डॉ.अजित खोत -रविवार डॉ.भापकर इतरवेळी........ या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article