
श्री शिव स्वयंभू परिवर्तन सहकारी पॅनेलाच मतदान करण्याचे अवाहन - दुर्योधन भापकर
लोणी भापकर :- बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील स्वयंभूनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीसाठी श्री शिव स्वयंभू परिवर्तन सहकारी पॅनेलच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे अवाहन पुणे महानगरपालिकेचे युवा नगरसेवक दुर्योधन भापकर यांनी केले आहे.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक ५ रोजी मतदान होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संस्थेचे 75 टक्के सभासद नाराज असल्याने सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. या पॅनेलला सायंबाचीवाडीसह लोणीभापकर येथील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह संस्थेच्या सभासदांचा मोठा पाठिंबा जाहीर केल्याने प्रचार प्रमुखांनी हाऊस हाऊस दौरा करत प्रचार पत्रक वाटले. दोन वेळा रॅलीच्या माध्यमातून सभासदांशी संपर्क केल्याने श्री स्वयंभू परिवर्तन सहकारी पॅनेलचे पारडे जड आहे. सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पॅनेलच्या तेराही उमेदवारांच्या पतंग चिन्हावर शिक्का मारून पॅनेलला मतदान करावे असे अवाहन सर्व उमेदवारांच्या वतीने दुर्योधन भापकर यांनी केले आहे.