
इथं तमाशा असतो का? मला बी बोलवत जावा की; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने पिकला हशा
Sunday, April 17, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
यावेळी ते म्हणाले की, 'इथं तमाशा असतो का? मला पण बोलवत जा लहान असताना आजोबा म्हणायचे चल तमाशाला. पण तेव्हा जात नव्हतो'. अजित दादांच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकला. त्यानंतर सावरुन घेत त्यांनी म्हटलं की, तुम्ही बघितलं काय अन् मी बघितलं काय एकच. उरूस सुरू आहे, यात्रा सुरू आहेत, त्याचा आनंद घ्या. भाषणाच्या शेवटी आत भुका लागल्यात. जेवतो, भाषण बंद करतो असं म्हटल्यानंतरही कार्यकर्ते पोट धरुन हसले.