
उद्या सकाळी १० वाजता वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिनाचं आयोजन
Tuesday, April 19, 2022
Edit
प्रत्येक आठवड्याला पोलीस स्टेशन स्थरावर स्थानिक पातळीवर तक्रार दाराच्या तक्रारीचे योग्यरीत्या निरसन करण्यासाठी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येत असते त्या अनुषंगाने एप्रिल महिन्यात यांच्या आदेशान्वये संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस स्टेशन स्तरावर उदईक रोजी वार बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला असून सदर तक्रारींचे निरसन करण्यासाठी माननीय श्री मिलिंद मोहिते सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण हे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी आपल्या तक्रारींच्या अनुषंगाने योग्य ती आवश्यक सर्व कागदपत्रे, लेखी पुरावे सोबत घेऊन वेळेवर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे हजर राहण्याचे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ लांडे यांनी केलेले आहे