
थोपटेवाडीतील मुजोर दुकानचालकांना कशाचा आलाय माज? छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेऊन कशाचा दाखवतायेत थाट
Sunday, April 24, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावातील किराणा दुकानचालक छापील किमतीपेक्षा जास्त रकम घेऊन वस्तूंची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही.
एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूविक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पॅकबंद वस्तू असतील आणि जास्त पैसे आकारात असल्यास वैधमापन विभागाकडून अशा आस्थापनावर कारवाई करण्यात येते. परंतु थोपटेवाडी गावातील दुकानदार मात्र सर्रास छापील किमतीपेक्षा जादा किंमत आकारत असून ग्राहकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वस्तू घेण्यासाठी ग्राहक दुकानात गेला असता व छापील किमतीपेक्षा जादा किंमत आकारत असल्याने ग्राहकाने वस्तूच्या बिलाची मागणी केली असता दुकानदार बिलास नकार देत आहेत व उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सदर दुकांदारावर प्रशासनाने योग्य ती कारवाई व ज्या ग्राहकांना आवेष्टित वस्तूबाबत तक्रार करायची असल्यास वैधमापन विभागाच्या ९८६९६९१६६६, ८१६९९९३२७० या क्रमांकावर तक्रार करावी.
तंबाखूजन्य पदार्थांची जोमात विक्री
थोपटेवाडी गावातील अनेक दुकानांत खुलेआम विमल, गुटखा, RMD सारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री जोमात सुरू आहे. यांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत व या मुजोर दुकानचालकांना त्यांची जागा दाखवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.