
मानसिक व शारीरिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल
Sunday, April 24, 2022
Edit
आम्हाला पिकअप चारचाकी गाडी करीता माहेरुन २ लाख रुपये घेवुन ये तरच येथे नांद नाहीतर तुझे आईचे घरी जा. असे वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करत मारहाण केल्या प्रकरणी पतीसह चौघांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निंबुत- लक्ष्मीनगर ता. बारामती येथील माहेरवाशीण असलेल्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती समीर ज्ञानोबा गाडे, सासु सुमन ज्ञानोबा गाडे ,सासरे ज्ञानोबा गाडे, नणंद पुनम राहुल गव्हाणे, नंदावे राहुल किसन गव्हाणे सर्व रा कापुरहोळ ता भोर जि पुणे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत कापुरहोळ ता भोर जि पुणे येथे फिर्यादी सासरी नांदत असतानाचे काळात कापुरहोळ ता भोर जि पुणे येथे पती समीर ज्ञानोबा गाडे, सासु सुमन ज्ञानोबा गाडे, सासरे ज्ञानोबा गाडे, नणंद पुनम राहुल गव्हाणे, नंदावे राहुल किसन गव्हाणे सर्व रा कापुरहोळ ता भोर जि पुणे यांनी समगनमताने फिर्यादीस आम्हास लग्नात योग्य मान पान दिला नाही तसेच घरातील कामे निट येत नाहीत तुझे घरच्यांनी आम्हाला लग्नात प्रापंचिक साहीत्य दिले नाही असे म्हणुन वेळोवेळी घालुन पाडुन बोलत तसेचट आम्हाला पिकअप चारचाकी गाडी करीता माहेरुन २ लाख रुपये घेवुन ये तरच येथे नांद नाहीतर तुझे आईचे घरी जा असे म्हणुन फिर्यादीचे पतीने समीर गाडे यांनी कोणत्या ना कोण्यात कारणावरुन हाताने मारहाण शिवीगाळ करुन वेळोवेळी शारीर मानसिंक त्रास देवुन फिर्यादीचा शारीरीक मानसिक जाच हाट , छळ करुन फिर्यादीस जिवे मारण्याची धमक दिली आहे . तसेच फिर्यादीचे सासरचे व वरील सर्वांनी फिर्यादीस वेळोवेळी मानसिंक तसेच शारीरक जाच हाट छळ केला आहे म्हणुन फिर्यादीची वरील आरोपी १ ते ५ यांचे विरुद्ध फिर्याद आहे फिर्यादीचे पती यांनी जिवे मारण्याची धमकी दिलेने कापुरहोळ येथे जायचे नसुन फिर्यादीला बारामती कोर्टात केस चालवायची आहे.