
बारामती: भोंडवेवाडी येथे दुचाकीस्वाराला लुटले; २ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास
Monday, April 25, 2022
Edit
बारामती तालुक्यातील मौजे भोंडवेवाडी हद्दीमध्ये एका दुचाकीस्वाराला दोन अज्ञात इसमांनी जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील असलेल्या मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत मधुकर तुकाराम चव्हाण राहणार चव्हाणवस्ती भोंडवेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे याने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून ते त्यांच्या मुलीला व नातवाला स्वत च्या घरी आणण्यासाठी गेले असता भोंडवेवाडी गावच्या हद्दीमध्ये कच्च्या रस्त्यावर दोन अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याजवळ असलेले सोने व रोख रक्कम व मोबाईल असा एकूण दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली असून दोन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय शेलार करीत आहे.