-->
सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचं टिपरू शिल्लक ठेवणार नाही- पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचं टिपरू शिल्लक ठेवणार नाही- पुरुषोत्तम जगताप

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आजअखेर १२ लाख ४१ हजार मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असुन यातुन सरासरी ११.७५ टक्केचा साखर उतारा राखत १४ लाख ५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.      
         कार्यक्षेत्रात अदयापही ७५ हजार मे. टनाच्या आसपास ऊस गाळपासाठी उपलब्ध असुन या सर्व ऊसाचे गाळप पुर्ण केल्याशिवाय कारखाना बंद करणार नसल्याची माहिती  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
           जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभुमीवर ऊसतोड कामगार हे शेतक-यांकडुन तोडीसाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारी कारखान्याकडे येत आहेत. आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपण तोडणीसाठी ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय माहे एप्रिल महिन्यापासुन घेतला होता परंतु नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आजपासुन आपण तोडणीसाठी १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत यात वाढ केली असल्याने कोणत्याही शेतकर्याने ऊसतोडीसाठी पैसे देवु नये. तशी मागणी कोणी केल्यास कारखान्यास लेखी कळवावे. यात जर ऊसतोड मजुरांनी पैसे घेतल्याचे आढळले तर त्यांचेकडुन कारखाना पैसे वसुल करेल त्यामुळे कोणीही ऊसतोडीसाठी पैसे देवु नये असे आवाहन मी करतो असे  जगताप म्हणाले.
      जगताप पुढे म्हणाले की, आपण कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस संपविल्याशिवाय कारखाना बंद करायचा नाही असा संचालक मंडळाचा निर्णय झाल्याने कोणाचा ऊस गाळपाचा असल्यास आपण त्याबाबत निश्चित्त रहावे.लवकरच आपल्या ऊसाचे गाळप केले जाईल. तसेच लागण हंगाम २०२२-२३ चे परीपत्रक लवकरच सभासदांकडे पोहचवण्यात येईल त्याप्रमाणे ऊस लागण करुन सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहनही अध्यक्ष जगताप यांनी केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article