
दरेकर मळा सहकारी पाणीपुरवठा संस्था निवडणूक बिनविरोध
Thursday, May 12, 2022
Edit
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील दरेकर मळा सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित निवडणूक बिनविरोध पार पडली. या संस्थेची स्थापना 10 /2 /1984 रोजी झाली. आज पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरीवर्ग पाणीपुरवठा संस्था चालवत आहे.व पुरेपूर फायदा घेत आहे, सर्व नियोजित बैठक होऊन 12 संचालक लोकांचे मंडळ स्थापन करण्यात आले. व सर्व सभासद व संचालकांचा निर्णय घेऊन श्री गुलाबराव बनकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. व व्हाईस चेअरमन पदी तुकाराम गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व पाणीपुरवठा सभासद वर्गाने यांचे अभिनंदन केले, व आनंद व्यक्त केला. येणाऱ्या काळात नवनवीन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला देत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा प्रत्येक शेतामध्ये पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होईल. कमी वेळेत शेतामध्ये पाणी आल्यामुळे जास्तीचा फायदा होऊ शकतो.असे मत व्यक्त केले यावेळी पुढील कारकिर्दीमध्ये बिनविरोध निवड पार पडावी असे मत व्यक्त केले व अनेकांनी शुभेच्छा दिल्या.