
वडगाव निंबाळकरमध्ये छ.धर्मवीर संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Sunday, May 15, 2022
Edit
बारामती - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ते येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. राजेश्वरराजे मित्र मंडळ, छावा ग्रुप, कंपनी बॉईज आयोजित 13 मे रोजी संध्याकाळी पुरंदर किल्ले ज्योत आणण्यासाठी प्रस्थान करण्यात आले व 14 मे रोजी सकाळी वडगाव निंबाळकर मध्ये सकाळी 9 वाजता आगमन होताच भव्य रॅली काढण्यात आली.तसेच सकाळी ठीक 10वाजता सौ. संगीतादेवी राजेनिंबाळकर राजेश्वरराजे राजेनिंबाळकर यांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले. आणि सायंकाळी भव्य अशी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व क्षेत्रांमधील सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळ, वाड्या-वस्त्या वरील लोक एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला. मर्दानी खेळ व फटाक्यांची अतिषबाजी, डीजे च्या गाण्यावर सर्व मोहीत होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. वेळोवेळी सर्व सण, जयंती उत्सव सामाजिक कार्य असतील सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने काम करत आहेत असे कंपनी बॉईज चे कौतुक करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या स्टाफ उपस्थित राहून सर्व शांतता व सुव्यवस्था राखून कार्यक्रमाची सांगता केली. तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. व शेवटी जेवणाचा आस्वाद घेण्यात आला व कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.