-->
बारामती-फलटण रेल्वे मार्गासाठी १३ गावांतील भूसंपादन वेगात; जूनअखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

बारामती-फलटण रेल्वे मार्गासाठी १३ गावांतील भूसंपादन वेगात; जूनअखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

बारामती : करोनामुळे रखडलेल्या बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गातील बारामती ते फलटण या मार्गात असलेल्या १३ गावांतील जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने केली जात असून जूनअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 
                भूसंपादनाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी या कामाचा दररोज आढावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.   या रेल्वेमार्गापैकी फलटण ते लोणंद या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप बारामती ते फलटण या मार्गातील भूसंपादनाचे काम अद्याप अपूर्ण आहे. या मार्गातील लाटे व माळवाडी या दोन गावांमधील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १३ गावांतील भूसंपादनाचे काम वेगाने होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

              या रेल्वेमार्गासाठी १८३ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. वाटाघाटीने भूसंपादन केले जाणार असून जमिनीची मोजणी आणि मूल्यांकनाचे प्रस्ताव वेगाने करण्यात येणार आहेत. भूसंपादन करताना निधीची कमतरता भासणार नाही.
           रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे जमीनमालकांना ताबडतोब मोबदला दिला जाणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

बारामती ते लोणंद मार्गाची लांबी ६३.६५ किलोमीटर
फलटण ते लोणंद मार्गाचे काम पूर्ण ३७.२० किलोमीटर
बारामती ते फलटण मार्गातील दोन गावांतील भूसंपादन पूर्ण १३ गावांतील भूसंपादनासाठी दररोज आढावा बैठका होत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article