-->
संकष्टी चतुर्थीनिमित्त तीर्थक्षेत्रे मयुरेश्वर मोरगाव येथे भाविकांची गर्दी; पन्नास हजार भावीकांनी श्रींचे घेतले दर्शन

संकष्टी चतुर्थीनिमित्त तीर्थक्षेत्रे मयुरेश्वर मोरगाव येथे भाविकांची गर्दी; पन्नास हजार भावीकांनी श्रींचे घेतले दर्शन

मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्रे मोरगाव ता. बारामती येथे आज उन्हाळी सुट्टीतील संकष्टी चतुर्थीमुळे राज्यभरातील भावीकांनी  मयुरेश्वर दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री उशीरापर्यंत सुमारे पन्नास हजार भावीकांनी श्रींचे दर्शन घेतले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली 
 संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आज  पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. यानंतर भावीकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता श्रींची पूजा करुन नैवद्य दाखविण्यात आला. मे महीन्याच्या उन्हाळी सुट्टीतील ही संकष्टी चतुर्थी असल्याने पुणे, सातारा, सांगली, उस्मानाबाद, विदर्भ, मराठवाडा, ठाणे, मुंबई  आदी भागातून गणेश भक्त अष्टविनायक यात्रा व संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आले होते.

आज होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पेठेतील दुकानदारांनी हार, दुर्वा, पेढे, यांनी सजवली होती. दुपारी श्रींची पुजा झाल्यानंतर चिंचवड देवस्थान मार्फत अन्नप्रसाद सुरु करण्यात आला याचा लाभ अनेक भावीकांनी घेतला. दिवसभर गर्दीचा ओघ सुरुच होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळी झालेल्या आरती प्रसंगी परीसरातील हजारो भक्त उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article