
निरा-बारामती रस्त्यावर चारचाकी गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू
Saturday, May 28, 2022
Edit
आज सकाळी ४ च्या दरम्यान नीरा बारामती रस्त्यावर एका महिंद्रा xuv या चारचाकी गाडीचा अपघात झाला आहे. ही गाडी सातारा जिल्ह्यातील पिंपोडे येथील होती. गाडीमध्ये चालकासह अन्य २ प्रवाशी होते.
यामध्ये संतोष कदम यांचा या अपघातात मृत्यू झाला असून जखमी प्रवीण कदम व भारतीय सैन्यदलातील अभिमन्यू कदम यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. सर्वजण पिंपोडे येथीलच रहिवासी होते. त्यांच्या अन्य एका सैन्यदलातील मित्राला सोडवण्यासाठी ते दौड ला गेले होते. माघारी येताना निंबुत येथील लक्ष्मीनगर ओढ्यानजीक हा अपघात झाला.