-->
पवारवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन; २१ रुग्णांची होणार मोफत नेत्र शस्त्रक्रिया

पवारवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन; २१ रुग्णांची होणार मोफत नेत्र शस्त्रक्रिया

मोरगाव : तरडोली ता. बारामती नजीक पवारवाडी येथे बुद्राणी हॉस्पिटल पुणेच्या  माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. याचा लाभ पंचक्रोशीतील रुग्णांनी घेतला असून २१ रुग्णांचे मोफत नेत्र शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
          पवारवाडी येथील सिध्देश्वर मंदीरात आज मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन छत्रपती शिवराय व अहील्याबाई होळकर  यांच्या प्रतीमेश पुष्पाहार अर्पण करून  तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भापकर, स्टॅंडींग कमीटी सदस्य मंगेश खताळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी,  सुरज भोईटे, मोहन पवार,  निलेश पवार, आशा वर्कर कुसुम पवार उपस्थित होत्या.
                   वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थांना नेत्र तपासणी करता यावी यासाठी    मंगेश खताळ, मोहन पवार , सुरज भोईटे यांनी या शिबीराचे आयोजन केले होते.  या शिबीरामध्ये मोफत नेत्र  तपासणीसाठी  तरडोली , मासाळवाडी, भोंडवेवाडी, मोरगांव येथील रुग्ण आले होते. या रुग्णांची तपासणी डॉ. आप्पासाहेब काळे, डॉ.गिरीश पाटील यांनी केले. शिबीरामध्ये तपासणी  केलेल्या रुग्णांपैकी २१ रुग्णांवर  मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांचे आजार, लेंस यांवर उपचार केले जाणार आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article