-->
भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शारदा भापकर तर व्हा. चेअरमनपदी अशोक पवार

भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शारदा भापकर तर व्हा. चेअरमनपदी अशोक पवार

मोरगाव :  तरडोली  ता. बारामती येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षीक निवडणूकीनंतर काल दि २ रोजी  चेअरमन  व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रकीया संपन्न झाली. या निवडीसाठी शारदा बाळकृष्ण भापकर यांचा  चेअरमनसाठी तर व्हाइस चेअरमनसाठी अशोक निवृत्ती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने  निवड प्रकीया बिनविरोध पार पडली  झाली.
तरडोली येथील भैरवनाथ सोसायटी निवडणुकीमध्ये भैरवनाथ परीवर्तन पॅनलने बाजी मारत  विरोधकांना नामोहरण करुन  सर्वच्या सर्व म्हणजे  १३ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर काल दि २ रोजी   चेअरमन पदाच्या झालेल्या निवडीसाठी विनायक सोपाना गाडे, रमेश कांतीलाल गाडे, शारदा बाळकृष्ण भापकर, अशोक निवृत्ती पवार,वसंत विठ्ठल भापकर, यशवंत शंकर भापकर, फुलचंद नानासो पवार, गौरी विनोद भोसले, प्रियांका सोमनाथ भापकर, बेबी गफुरभाई तांबोळी,किसन हरीबा धायगुडे ,  रवींद्र गुलाब साळवे ,नवनाथ जगन्नाथ जाधव हे  संचालक उपस्थित होते. उपस्थितांपैकी  पैकी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी   शारदा बाळकृष्ण भापकर तर   अशोक निवृत्ती पवार यांचा  व्हाईस चेअरमनपदासाठी  केवळ एकच अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रकीयेसाठी निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून एस. एम. बोबडे यांनी कामकाज पाहीले.  नुतन पदाधीकाऱ्यांचे  स्वागत संजय भापकर, उपसरपंच महेंद्र तांबे, माजी सरपंच  नवनाथ जगदाळे यांनी केले. 

या निवडीनंतर बोलताना चेअरमन शारदा भापकर यांनी सांगितले की, भैरवनाथ  सोसायटीमधील सर्व    शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार आहे . तसेच संस्थेचे कामकाज अधीकाधीक विश्वासार्हपणे पार पडणार आहे. तर व्हाईस चेअरमन अशोक पवार यांनी सांगितले की सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कामकाज पाहणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article