
सुप्यात मद्यधुंद ड्रायव्हरने ट्रक हॉटेलमध्ये घातला; एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी
Monday, May 30, 2022
Edit
सुपे मोरगाव अष्टविनायक मार्गावर डायमंड चौक सुपे येथे भरघाव वेगान आलेल्या ट्रक हॉटेलमध्ये शिरल्याने भिषण अपघात झाला आहे.
ट्रक नं.MH 16 CC 6123 चालक हनुमंत भालके रा.निलगा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला असुन या घटनेत तीन व्यक्ती चिरडले असुन प्राथमिक माहितीनुसार या मध्ये एक महिला व दोन पुरूष गंभीर जखमी झाले आहेत, जखमी इस्माईलभाई काझी सोयल काझी, मुझाईद सय्यद यांना सुपे येथील ग्रामीण रुग्णालय व केडगाव साई दर्शन येथे उपचारासाठी पाठविले आहे. यामध्ये रुक्सना दिलावर काझी वय ४५ यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा स्टाप तत्परतेने घटना स्थळी पोहचला व जखमींचा उपचारासाठी पाठविले.
युनूस काजी यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ड्रायव्हर हनुमंत भालके यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.