-->
महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल केल्याने दोघा पती-पत्नीवर गुन्हा दाखल

महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल केल्याने दोघा पती-पत्नीवर गुन्हा दाखल

पीडित महिला यांचा पती व ती देवीलाल पेमाराम कुमावत वय तीस वर्ष राहणार माळेगाव बारामती यांच्याकडे बांधकाम  मिस्त्री म्हणून काम करण्यास होते. त्यावेळेस त्याचे पत्नी पीडित महिला हीचे प्रकाश कुमावत सोबत प्रेम संबंध निर्माण झाले त्यानंतर ते व्हाट्सअप वर एकमेकाशी चॅटींग करु लागले एकमेकांच्या अर्धनग्न फोटो तसेच सोबतचे फोटो एकमेकांना शेअर केले. त्या वेळेस प्रकाश याने चॅटिंग दरम्यान व्हाट्सअप वर स्क्रीन शॉट काढून ठेवले. त्यानंतर पीडित महिलेचा पती  व ती प्रकाश यांच्याकडील काम सोडून दुसरीकडे गेला. त्यावेळेस प्रकाश व त्याची पत्नी पायल या दोघांनी पीडित महिला व तिच्या पती यांना  सांगितले की परत त्याच्याकडेच कामाला या त्यावेळेस तिच्या पतीने व तिने  कामावर यायला नकार दिला. त्या वेळेस त्या दोघांनी सदर महिलेचे प्रकाश सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि पीडित महिला व तिच्या पती यांच्या नातेवाईकांना व्हाट्सअप वरून सदर चे फोटो पाठवले. पोलिसांनी खात्री करून दोघा पती-पत्नीवर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अक्ट 2000 कलम 67 व भादवि कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली व त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. सोशल मीडियावर अश्‍लील फोटोग्राफ प्रकाशित करणे फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे त्यामुळे अश्लील फोटो मॅसेज व्हायरल करू नयेत तसं केल्यास तक्रारी प्राप्त झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक बारामती शहर  सपोनि प्रकाश वाघमारे पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article