
राज्याचे माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी सहकुटुंबासह घेतले अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मोरगावचे दर्शन
Thursday, May 26, 2022
Edit
मोरगाव : राज्याचे माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे सहकुटुंब अष्टविनायक यात्रेसाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्रे मोरगाव ता. बारामती येथे आले होते. त्यांनी श्रींची अभीषेक पुजा करून मंदिर परीसराची पाहणी केली.
आजपासून राज्याचे माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी सहकुटुंब अष्टविनायक यात्रेस सुरवात केली. अष्टविनायक तीर्थक्षेत्र महड, पाली, जेजुरी नंतर ते मोरगाव येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी सहकुटुंब मयुरेश्वराची अभीषेक पुजा करून आरती केली. यानंतर येथील पुजारी गजानन धारक यांनी मंदिर परीसराची माहीती देऊन त्यांचा सन्मान शाल देऊन केला.
देवस्थानच्यावतीने सुरू असलेले अन्नसत्र, भक्तनिवास आदी उपक्रमाविषयीची माहिती त्यांनी घेतली. मंदिरामध्ये गर्दी असूनही परीसरात असलेल्या स्वच्छते विषयी समाधान त्यांनी व्यक्त केले. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी तरारे यांचा शाल, श्रीफळ, श्रींची प्रतीमा देऊन सन्मान केला. यानंतर पुढील अष्टविनायक दर्शनासाठी ते सिध्दटेक येथे गेले.