-->
ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर; ........या तारखेला होणार मतदान

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर; ........या तारखेला होणार मतदान

  पुणे, दि. 3: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून  रोजी मतमोजणी होणार आहे. 

 तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस  5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी
उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 मे या कालावधीत 14 मे, 15 मे तसेच 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येणार आहे.  
नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम  दिनांक 25 मे असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
     मतदान  5 जून  रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील.  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 9 जून  2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
       जिल्हयात 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article