
गाडीला धडक देऊन झाला पसार; कोऱ्हाळे येथील एकावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Friday, May 6, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील को-हाळे गावचे हद्दीत निरा डावा कॅनॉल जवळ मुढाळे रोडवर आप्पासो शंकर पानगे वय 74 वर्षे रा.को-हाळे बु!! हे त्याचे ताब्यातील मोटार सा नं एम एच 42 ए एक्स 8557 ही वरुन पेशवेवस्ती ते मुढाळे रोडणे घरी येत असताना त्यावेळी ओंकार कैलास साळुंके रा. को-हाळे याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल वर पेट्रोंलचे टाकीवर उसाचे वाढेचे ओझे घेवुन चुकीच्या दिशेने येवुन त्याने आप्पासो शंकर पानगे यांचे ताब्यातील मोटार सायकलला समोरुन धडक देवुन अपघात केला.
अपघातात अप्पासो पानगे यांच्या डावे डोळयाचे भोवईवरती तसेच नाका तोंडातुन मार लागल्याने गंभीर दुखापत झाली.
अपघाताची खबर न देता ओंकार साळुंखे पळुन गेला.
आप्पासो पानगे यांचा मुलगा दत्तात्रय पानगे यांनी फिर्याद दिल्याने त्याच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पो हवा फणसे हे करीत आहे.