
लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाला मोटारसायकलची जोरदार ठोस; जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
Sunday, May 29, 2022
Edit
मोरगाव : मोरगाव जेजुरी रस्त्यावर आज झालेल्या अपघातात भवानीनगर येथील एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. लघुशंकेसाठी ते थांबले असता. मोटारसायकलने जोरदार ठोस दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोरगाव - जेजुरी रस्त्यावर आज दि २९ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भवानीनगर येथील चार मित्र चारचाकी वाहनाने जेजुरी वरुन भवानीनगर येथे येत असताना चोरवाडी परीसरात आले असताना लघुशंकेसाठी थांबले होते. यामध्ये विनोद जाधव (वय वर्षे ३२ ) रा भवानीनगर ता इंदापुर जि.पुणे हे सुद्धा थांबले होते. याच दरम्यान अज्ञान दुचाकीने जोरदार ठोस दिल्याने विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी मोरगाव जेजुरी रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलला हलविण्यात आले होते . मात्र डॉक्टरांनी त्यांना म्रुत घोषित केले .