-->
रयत शिक्षण संस्थेचा २०१९-२० चा कर्मवीर पारीतोषीक मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत

रयत शिक्षण संस्थेचा २०१९-२० चा कर्मवीर पारीतोषीक मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत

मोरगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी  आज सर्वत्र उत्साहात संपन्न झाली. पुण्यतिथी  निमित्ताने  सन २०१९ -२० चा  कर्मवीर पारीतोषीक  हा पुरस्कार आज  रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोरगाव या शाखेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
 रयत शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी  कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने कर्मवीर पारीतोषिक हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखेस  वितरीत केला जातो. आज  पुण्यतिथी निमित्ताने  सातारा झालेल्या कार्यक्रमप्रसंगी  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , संस्थेचे चेअरमन अनिल पाटील  यांसह  विविध मान्यवर  उपस्थित होते .  सन  २०१९-२०२० चा "कर्मवीर पारितोषिक" हा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील  मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास देण्यात आला . हा पुरस्कार  स्वीकारण्यासाठी श्री मयुरेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय पांढरे सर,सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक  पोपट तावरे ,मोरगावचे सरपंच निलेश केदारी,विद्यालयाचे यादव सर व गायकवाड सर उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article