-->
मयुरेश्वर मोरगाव मंदिराला जी.आय. गृपच्या वतीने एल.सी.डी. टी. व्ही. स्क्रीन भेट

मयुरेश्वर मोरगाव मंदिराला जी.आय. गृपच्या वतीने एल.सी.डी. टी. व्ही. स्क्रीन भेट

मोरगाव : अष्टविनायक गणपती प्रथमस्थान असलेल्या मोरगाव ता. बारामती  येथील श्री मयुरेश्वर मंदिरात जी.आय. गृपच्या  यांचे माध्यमातून एल.सी.डी.  टी. व्ही. स्क्रीन देणगी स्वरुपात दिला आहे.  मयुरेश्वर मुख दर्शनासाठी या एलईडी टी. व्ही. संचाचा उपयोग होणार आहे.


              मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम तिर्थक्षेत्र असल्याने राज्यभरातून भावीक मयुरेश्वर दर्शनासाठी येतात. या भावीकांना श्रींचे मुख  दर्शन घेता यावे यासाठी ५० ईंची  एलईडी स्क्रीन चिंचवड देवस्थान ट्रस्टला भेट दिला आहे. हा टीव्ही संच सायंबाचीवाडीचे उपसरपंच प्रमोद जगताप व जे. आय गृपचे  काजळे यांच्या हस्ते चिंचवड  देवस्थान  ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांकडे  देण्यात आला. यावेळी गणेश जगताप, नागेश भापकर, ऋषीकेश  भापकर, करण बोबडे, 2ज्ञानेश्वर बर्ग्रे, अक्षय यादव  आदी 
उपस्थित होते.
         भावीकांना या एलईडीमुळे मुख दर्श घेता येणार आहे. गणेश उत्सव काळात या एल ईडी संचचा फायदा होणार आहे. तसेच मुख्य मुर्ती पुजा, आरती भावीकांना थेट पाहता येणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article