
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ८०१ बाटल्या रक्त संकलित
Saturday, September 24, 2022
Edit
कोऱ्हाळे बु - वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, सर्व ग्रामपंचायत, सर्व पत्रकार बंधू, सर्व पोलीस पाटील, सर्व होमगार्ड, महिला दक्षता समिती, सर्व सेवाभावी संस्था, तसेच सर्व नागरिकांच्या मदतीने व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आज रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दूरक्षेत्र श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव, माऊली लॉन्स मंगल कार्यालय सुपा, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसने येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते तरी एकूण 801 रक्तदान बॅग रक्त संकलन झाले. (वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन 165, करंजेपूल दूरक्षेत्र 251, श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव 104, माऊली लॉन्स मंगल कार्यालय सुपा 179, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसने 101) येथे रक्त संकलन झाले. रक्तदान करणाऱ्या सर्वांचे पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.