-->
कोऱ्हाळे बु|| येथील दोघांनी मिळून करंजेपुल येथील दुकानातील चोरल्या दिड लाखांच्या बॅटऱ्या, वडगाव निंबाळकर पोलिसांनी कमाल करत चोरीचा गुन्हा १२ तासात केला उघड

कोऱ्हाळे बु|| येथील दोघांनी मिळून करंजेपुल येथील दुकानातील चोरल्या दिड लाखांच्या बॅटऱ्या, वडगाव निंबाळकर पोलिसांनी कमाल करत चोरीचा गुन्हा १२ तासात केला उघड

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील करंजेपुल गावचे हददीत करजेपुल ते सोमेश्वर मंदिर रोडलगत पत्र्याचे गाळेमध्ये येथे दि. १५/०९/२०२२ रोजी २०:३० वा ते दि. १६/०९/२०२२ रोजी सकाळी ०८:३० चे सुमारास फिर्यादीचे सोमश्वर ॲटो इलेक्टिक बॅटरीचे दुकानचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन दुकानातुन १, ५२,३२८/-रूपये किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या इलेक्ट्रिक बॅटच्या अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले आहे. सदर बाबत वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२७ / २०२२ भादवि ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता.
 सदर गुन्हयातील मुद्देमाल हा हातगाडीवर भरून दुकानपासून दूर अंतरावर घेऊन अज्ञात वाहनातून घेऊन गेले होते. सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सन्दर गुन्हयातील आरोपी व मुददेमाल है बोलेरो पिकअप वाहनातून घेऊन गेले असलेचे निष्पन्न झाले, सन्दर गुन्हयाचा शोध हा सी सी टी व्ही फुटेज व गोपणीय माहीतीच्या आधारे माहीती घेत मिळाली की कोन्हाळे बु।। येथील एका वस्तीवरील घराजवळ बोलेरो पीक अप वाहन व संशईत आरोपी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली सदर ठिकाणी जाऊन संशईत आरोपी नसरूददीन हिरामन भोसले याला ताब्यात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत सदर ना गुन्हा केले असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे कामी १) नसरूददीन हिरामन भोसले वय २० वर्षे रा पानगेवस्ती कोऱ्हाळे बु॥ ता बागमती २) संतोष आसाराम माळी रा पानगेवस्ती कोऱ्हाळे बु।। ता बारामती व चोरीचा माल घेणारे ३) सुनिल लाला निंबाळकर रा लासुर्णे ता इंदापुर जि पुणे ४) प्रितम शांतीलाल गांधी रा लासुर्णे ता इंदुपर जि पुणे यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, पोहवा अनिल खेडकर, पोहवा महेंद्र फणसे, पोना अमोल भोसले, पोना सागर देशमाने, पोना न्हदयनाथ देवकर, पोना. कुंडलिक कडवळे, पोना भाउसाहेब मारकड, पोना सागर चौधरी, पोशि महादेव साळुखे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ यांनी केली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article