
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिरास शिरष्णे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
Saturday, September 24, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत मा.डॉ.श्री.अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व श्री.मिलिंद मोहिते सो. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच मा.श्री.गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास सर्वत्रच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये शिरष्णे येथे नागरिक सकाळपासून रक्तदान करण्यास येत आहेत. ज्यांनी अजून रक्तदान केले नाही त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या ठिकाणी जाऊन रक्तदान करावे असे अवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.