
राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात व्याख्यान
Monday, September 19, 2022
Edit
अंजनगाव - प्रतिनिधी
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे औचित्य साधत अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात आहार, व्यायाम, योगासने व पोषण विषयक जनजागृती चा कार्यक्रम नुकताच पार पडला.
आहार तज्ञ सिमरन इनामदार व केतकी घोरपडे यांनी सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंके होते.
यावेळी बोलताना आहार तज्ञ सिमरन इनामदार यांनी विविध अन्नघटक, संतुलित आहार, अन्न घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार सविस्तर मार्गदर्शन केले.
आहार तज्ञ केतकी घोरपडे यांनी व्यायाम व योगासनाचे महत्त्व सांगत निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या आरोग्य विषयक सवयी लावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच एस गडकरी यांनी केले तर आभार ए जे सोनवणे यांनी मानले.