
प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या वतीने तरडोली येथे सेवा पंधरवडा विशेष मोहीम
Wednesday, September 21, 2022
Edit
मोरगाव : प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याच्या साठी शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा विशेष मोहीम शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरा अंतर्गत तरडोली तालुका बारामती येथील लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिकेचे वाटप मोरगाव मंडलाधिकारी निळकंठ मुळे यांच्या करण्यात आले.
प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा विशेष शिबिराच्या आयोजन आज दिनांक 21 रोजी करण्यात आले होते. नागरीकांनी दाखल केलेली व प्रलंबित प्रकरण यामध्ये निकाली काढण्यात आली.बारामती तालुक्यातील तरडोली येथे सदर शिबिरामध्ये नवीन शिधापत्रिकेचे वाटप मोरगाव मंडळ अधिकारी निळकंठ मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले कामे मार्गी लागले नाही शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी गाव कामगारा तलाठी श्याम झोडगे , सोमेश्वर सहकारी साखर कारखाने संचालक किसन तांबे, उपसरपंच महेंद्र तांबे, कोतवाल संतोष खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.