
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Thursday, September 22, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत मा.डॉ.श्री.अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व श्री.मिलिंद मोहिते सो. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच मा.श्री.गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे.
हे रक्तदान शिबीर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दुरक्षेत्र, माऊली मंगल कार्यालय सुपा, सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव व शिरष्णे येथे सकाळी ९ ते ५ पर्यंत पार पडणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक उच्चांक केला होता. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मधील ३ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान करून सक्रिय सहभाग सहभाग नोंदवला होता. यावर्षी मागील वर्षीचा उच्चांक मोडतो का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.