-->
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मयुरेश्वर मंदिरामध्ये अभीषेक -पूजा व श्रींची आरती संपन्न

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मयुरेश्वर मंदिरामध्ये अभीषेक -पूजा व श्रींची आरती संपन्न

बारामती  : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आले होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिल्यानंतर मयुरेश्वर मंदिरामध्ये त्यांनी अभीषेक -पूजा व श्रींची आरती केली.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यानिमित्त आल्या होत्या. त्यांनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व  जनरिक मेडिक मेडिकलला भेट दिली.यानंतर मयुरेश्वर मंदिरामध्ये आल्या यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,  आमदार राहुल कुल, कांचन कुल, अंकिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप आप्पा खैरे , किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  वासुदेव  काळे,  राहुल शेवाळे, जालींधर कामठे, सरपंच निलेश केदारी, पोपट तावरे, रविंद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंदिरात आल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले. येथील पुजारी मंडळींनी  मंत्रोपचाराचे पठण करीत अभिषेक- पूजा व श्रींची आरती केली. मयुरेश्वर मंदिराच्या पुरातनेविषयी  व येथील व्यवस्थापना संदर्भात  त्यांनी माहीती घेतली.  श्रींच्या अभीषेक पुजानंतर  चिंचवड दिवसांत ट्रस्टच्या वतीने विश्वस्त विनोद पवार यांनी निर्मला सितारामण यांचा  शाल, श्रींची प्रतिमा,  श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article