
स्थलांतरित नवीन बस स्टँड कसबा ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बस चालू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
Saturday, September 24, 2022
Edit
बारामती :- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती मधील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व प्रास्ताविक बारामती बस स्थानक तयार करण्यासाठी जुने बस स्थानक राष्ट्रवादी भवन ,कसबा येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ जाणार आहे.
परंतु स्थलांतरित बस स्थानक ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मधील अंतर चार ते पाच किलोमीटरच्या असून पायी ये- जाणारे विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. हे अंतर लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. यामुळे बस चालू करण्याकरिता प्रथम निवेदन श्री संभाजी नाना होळकर (तालुकाध्यक्ष बारामती राष्ट्रवादी काँग्रेस) व बारामती बस स्थानक प्रमुख श्री अमोल गोंजारी साहेब यांना देण्यात आले.
श्री.गोंजारी साहेबांबरोबर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन लवकर बस लवकरात लवकर बस चालू करण्याचे आश्वासन दिलेले आहे.विद्यार्थ्यांसाठी हे निवेदन देण्यासाठी
ए.बी.पाटील (यिन उप मुख्यमंत्री,म.राज्य व यिंन अध्यक्ष तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय),अण्णा पाटील योगेश गावडे,ओंकार नांगरे निखिल गावडे व प्रीतम गुळूमकर उपस्थित होते.