
ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे साहित्याचे जतन, कल्पदिप साहित्य मंच चा नवा उपक्रम
Tuesday, September 6, 2022
Edit
इंदापूर प्रतिनिधी :
कोरोनाने माणसाला जगायला शिकवले तसेच ऑनलाइन मिडियाने एकमेकांना जोडून ठेवायला शिकवलं. विसरत चाललेल्या साहित्याचा जागर अविरतपणे तेवत ठेवण्याचे काम कल्पदिप ने करून त्यांचे प्रथम ऑनलाइन कवी संमेलन पार पाडले.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे अवचित साधुन सदर संमेलन ऑनलाइन पद्धतीने पार पडले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे करून एक नवा इतिहास कल्पदिपने महाराष्ट्रात रोवला आहे असे म्हणायला वावगे ठरणार नाही.
सदर संमेलनाचे अध्यक्ष स्थान मान. कल्पना रेडेकर यांनी स्विकारले व मान. अंजना गायकवाड, मान. औदुंबर भोसले, डॉ. निशिगंधा अभंग, डॉ. गीतांजली अभंग या कवींनी प्रमुख अतिथी स्थान स्विकारले.
शिक्षण, कवी, कविता, लेखक यासारख्या विविध विषयांवर संमेलन अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे मार्गदर्शन लाभले तथा त्यांनी शालेय जीवनातील स्वतःचे अनुभव देखील सांगीतले. तसेच विविध विषयाला शिक्षक दिनास जोडून त्यांचा एकमेकांना संदर्भ जमवून प्रत्येक कवीने आपली कविता सादर केली व कवींचा सन्मान म्हणून कल्पदिप साहित्य मंच ने प्रत्येक कवीस सन्मानपत्र देवून गौरविले.
यावेळी कवयित्री रोहिणी पराडकर लिखित कवितेचे प्रियंका जगझाप यांनी वाचन करून ते संमेलनाचे अध्यक्ष कल्पना रेडेकर यांना भेट म्हणून दिली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा कल्पदिप साहित्य मंचच्या कार्याध्यक्ष प्रा. तेजल वैती यांनी संभाळली. कार्यक्रमाचे आयोजन प्रियंका जगझाप, रोहिणी पराडकर, विशाल गाडेकर, अमोल साबळे, तेजल वैती, सुमित वाघमारे या कवींनी केले.