
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मयुरेश्वराची आरती संपन्न
Wednesday, September 7, 2022
Edit
मोरगाव : अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे काल दि. ७ रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शनानंतर श्रींची आरती, पुजाअर्चा केली.
भाजपाच्यावतीने बारामती येथे विविध कार्यक्रमा निमित्ताने भाजपाचे अनेक दिग्जज नेते आले होते. काल दि ६ रोजी रात्री दहा वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मयुरेश्वर दर्शनासाठी आले होते. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, माळेगाव कारखाना माजी चेअरमन रंजनकाका तावरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालीधंर कामठे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, रविंद्र साळवे, हर्षवर्धन भापकर, राजवर्धन भापकर पुजारी दिलीप वाघ, गजानन धारक उपस्थित होते .
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दर्शनंतर मंदिर ईतिहास व मंदिराची पुरातनता याविषयी माहीती घेतली. बावनकुळे व पदाधीकाऱ्यांनी मयुरेश्वर मंदीरात श्रींची आरती, अभीषेक पुजा अर्चा केली. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी बावनकुळे सह पदाधीकाऱ्यांचा सत्कार श्रींची प्रतीमा, शाल, श्रीफळ देऊन केला.