-->
बारामती: जातीवाचक बोलत शिवीगाळ करून ग्रामविकास अधिकाऱ्यालाच ठेवले डांबून; वाघळवाडी येथील प्रदीप उर्फ दादू मांगडे यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती: जातीवाचक बोलत शिवीगाळ करून ग्रामविकास अधिकाऱ्यालाच ठेवले डांबून; वाघळवाडी येथील प्रदीप उर्फ दादू मांगडे यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

     सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नरसिंग दौलत राठोड यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याने तसेच जातीवाचक बोलल्याने व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गावातील प्रदीप उर्फ दादू मांगडे यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        सविस्तर माहिती अशी की,  वाघळवाडी ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे रसिंग राठोड यांना प्रदीप मांगडे याने ग्रामपंचायत आँफिस मध्ये येवुन कार्यालयात काम करणारे कर्मचारी आँफिस मध्ये काम करत असताना त्याने आँफिसला बाहेरुन कडी लावल्याने राठोड हे आँफिस बाहेर असताना आँफिस मधील कर्मचारी यांनी त्याना बाहेरील कढी काढण्यास सांगितलेने व आँफिसचे बाहेर उभे असलेले गावाचे ग्रामस्थ बाऴकृष्ण शिवाजी भोसले व अऩिल नामदेव शिदे यांना 8 अ चा उतारा देयचा असलेने ते आँफिसचा दरवाजा उघडुन आल जात असताना आरोपीने फिर्यादीस बाजुला ढकलुन देवुन आँफिस चा दरवाजा उघडण्यापासुन दुर ढकलुन देवुन म्हणाला की "ये भाऊसाहेब तुला किती फोन केले, तु माझे फोन उचलत नाही, पारध्या टाकनक-या तुला आमचे गावात काय नुसता पगार घ्यायला बसविला काय? माझे दिलेले अर्जाचे काय केले, का नुसते अर्ज घेतोस, आणि गांडीत घालुन ठेवतोस काय? पहीली माझे अर्जाची माहिती दे नायतर तुला कामच करू देत नाही .असे जातीवाचक बोलुन तुला दरवाजा उघडु देत नाही त्यांना राहुदे आत  .आणि तु बस इथे बाहेरच, तुझ्या कडे बघतोच ,असे म्हणुन शिवीगाऴ दमदाटी करुन सरकारी कामात अढथऴा निर्माण केला आहे .तसेच आरोपीने त्याचे कडील फोन नं.9142303302, 7057681113, 9921796247 यावरून फिर्यादीचा मोबाईल नं 7975554753 यावर वारंवार फोन करुन गावात चालु असलेले सर्व विकास कामामध्ये ठेकेदार लोकांकडे कमिशन घेता त्यांचे बिले काढता तुमची चौकशी लावली आहे. 
              तु ठेकेदारांची बिले काढ तुझ्याकढे बघतो अशी धमकी देवुन तुझे विरुद्ध दिलेले तक्रार अर्ज मागारी घेवुन तुझा त्रास कमी करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील. असे फोन वर बोलुन दिनांक 12 मे 2022 रोजी 1700 वा चे सु।। फिर्यादी हे वाघऴवाडी गावातुन त्यांचे रुम वर जात असताना आरोपी याने फिर्यादीस समक्ष भेटुन तक्रारी अर्ज मागे घेयचे असतील व त्रास नको असेल तर 5000/- रुपये द्या, नाहीतर तुमच्या विरुद्ध चा तक्रारी मी सगऴीकडे तसेच वरच्या अधिका-यानां पाठविण व तुम्हाला कामाला लावीण अशी धमकी दिली आहे.
              त्यानंतर त्याच दिवशी सायं 18/56 वाचता आरोपी मजकुर याने त्याचा फोन नं 8142303302 यावरुन फिर्यादीचे फोन वर फोन करुन " आपले वाघऴवाडी" नावामचे डिजिटल पाटीचे बिल 1,50,000 बिल  राजु गायकवाड यांचे नावावर चेक काढा व वरील पैसे मला द्या असे म्हणुन मी तुमचे रुम वर येतो  तुम्ही मला 5000/-रुपये तयार ठेवा असे म्हणुन फिर्यादीस खंडणी मागीतली आहे .त्यानंतर 30 मिनिटात फिर्यादीचे रुमवर जावुन "ये भाउसाहेब कोठेयत 5000/- रूपये दे कि,झाले का तयार? का परत उदया तुझे आँफिसमध्ये येवुन राडा करू का राडा?" असा दम दिला. तेव्हा त्यास मी समजावुन सांगत होतो.परंतु त्याने मला तु जर मला 5000 रूपये दिले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून तु ‘ आमचे गावात कसे काम करतोय ते मी बघतोच’ असा दम देवुन तो निघुन गेला आहे. 
           आरोपी प्रदीप मांगडे याच्यावर गुन्हा दाखल करुन गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्याची तजविज ठेवली असून  पुढील तपास श्री गणेश इंगऴे (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग ) हे करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article