-->
पांडेश्वर येथील ओढ्यात वाहून गेलेल्या अजय शिंदे यांच्या नातेवाईकास प्रशासनामार्फत चार लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप

पांडेश्वर येथील ओढ्यात वाहून गेलेल्या अजय शिंदे यांच्या नातेवाईकास प्रशासनामार्फत चार लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप

मोरगाव:  पुरंदर तालुक्यातील  पांडेश्वर येथील ओढ्यास  दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आलेल्या पुराच्या पाण्यात  अजय  व्यंकट शिंदे हा 37 वर्षे युवक  वाहत  जाऊन मृत्यू झाली असल्याची दुर्दैवी घटना घडली होती.  या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास आज प्रशासनामार्फत चार लाख रुपयांचा धनादेश वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे व मंडलाधिकारी गोपाळ लाखे यांच्या हस्ते करण्यात आले. 
बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यात सर्वदूर झालेला पावसामुळे जागोजागी नदी , नाले ,  ओढ्यास  पूर आला होता. यामुळे आर्थिक हानीसह  अनेक दुर्दैवी घटना घडल्या होत्या. अशीच  दुर्दैवी घटना पांडेश्वर येथे दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी घडली होती.  दुकानात साहीत्य आणण्यासाठी  गेलेला  अजय  शिंदे  हा  आपल्या रोमणवाडी येथे ओढा पार करत असताना पुराच्या पाण्यात वाहत  जाऊन त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज प्रशासना मार्फत तात्काळ त्याची  नातेवाईक भाऊजय सुवर्णा किरण शिंदे  यांस  आर्थिक मदतीचा चार लाख रुपयांच्या धनादेशचे वाटप करण्यात आले.

 याप्रसंगीराष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, मंडलाधीकारी गोपाळ लाखे, तालाठी प्रांजली कुदळे, 
पोलीस पाटील अरुण धुमाळ, सरपंच किशोर  लवांडे, पंढरीनाथ सोनवणे, संजय जगताप,प्रताप रासकर, उत्तमराव शिंदे आदी मान्यवर होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article