
शासनाकडून सर्वसामान्यांची दिवाळी गोड; तरडोली येथे २२२ कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप
Sunday, October 23, 2022
Edit
मोरगाव : यंदा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप सर्वत्र करण्यात येत आहे. तरडोली ता.बारामती येथेही आनंदाचा शिधा वाटप २२२ कार्डधारकांना आज दि २३ रोजी सरपंच विद्या भापकर व भाजपाचे पदाधिकारी रवींद्र साळवे, राजवर्धन भाकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी दीपावलीचे किट सर्व कार्डधारकांना प्रशासनाच्यावतीने वितरित करण्यात येत आहे. तरडोली ता.बारामती येथे आज 222 कार्डधारकांना या दीपावलीचा आनंदाचा शिधा वितरण करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच विद्या भापकर , भाजपाचे पदाधिकारी रवींद्र साळवे, राजवर्धन भापकर, हर्षवर्धन भापकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, भैरवनाथ सोसायटी माजी चेअरमन चंदूभाई तांबोळी, स्वस्त धान्य दुकान चालक दिनेश लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना व गोरगरीब लोकांना दिपावली निमित्ताने मिळणाऱ्या या अन्नधान्य शिधा किट मिळाल्याने येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले.