
कष्टकऱ्यांसह शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी तरडोली येथे हेल्पींग हॅंड संस्थेकडून २०० किलो साखरेचे वाटप
Monday, October 24, 2022
Edit
मोरगाव : कष्टकऱ्यांसह शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी तरडोली ता. बारामती येथील हेल्पींग हॅंड या संस्थेकडून आज २०० किलो साखर वाटप करण्यात आले. कृषी उत्पादन बाजार समीतीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली.
गावातील शेतकऱ्यांसह , कष्टकरी व सामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी तरडोली ता. बारामती येथील हेल्पींग हॅंड ही संस्था पुढे आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सचीन कांबळे व अनिल कदम यांनी आज गावातील गरजवतांना कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांच्या हस्ते साखरेचे वाटप केले. यावेळी रवींद्र साळवे, मंगेश खताळ, हर्षवर्धन भापकर, विशाल कांबळे, जालींदर गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्थे मार्फत नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जात आहेत. आज गावातील दोनशेपेक्षा अधिक लोकांना साखरेचे वाटप करण्यात आले. यामुळे लाभ धारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.