
लाटे येथील निरा नदीच्या बंधाऱ्यावरील बर्गे चोरणारी टोळी जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलीसांची कारवाई
Saturday, October 29, 2022
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १७/१०/२०२२ ते २३/१०/२०२२ रोजी मौजे लाटे ता. बारामती गावचे हद्दीत निरा नदीचे बंधाऱ्याचे जवळील पाटबंधारे विभागाचे चौकीचे मागील बाजुचे मोकळे मैदानातून बंधाऱ्यावरील ५७०००/- रू किंमतीचे ४० लाखंडी बर्गे अज्ञात चोरटयांनी चोरी करून नेलेबाबत राजेंद्र कोंडीबा कदम धंदा नोकरी वडगाव पाटबंधारे शाखा रा कांबळेश्वर ता बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचे तपासात बंधाप्याचे वर्गे चोरी झालेबाबत माहीती मिळणे कामी खुप मोठया प्रमाणात सी. सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करून तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झालेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. सोमनाथ लांडे व पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशईत आरोपी नामे १) गणेश शंकर जाधव रा निरा ता पुरंदर जि पुणे यास निरा येथून ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केला असता इतर साथिदार २) शुभम किसण बरकडे रा लोणंद ता खंडाळा जि सातारा ३) विकास बाजीराव गायकवाड रा बोरीऐंदी ता दौंड जि पुणे ४) विशाल चव्हाण रा निरा पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ५ ) शशांक सोनवणे स निरा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही ६) आर्यन माचरे रा पाडेगाव ता खंडाळा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही ७) शुभम माचरे रा पाडेगाव ता खंडाळा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही तसेच गुन्हयातील चोरीचा माल घेणारा टे) अभिजित कोंडीबा भोसले रा यवत ता दौंड जि पुणे यांचेसोबत लाटे ता बारामती येथील निरा नदीचे पात्रातील बंधान्याचे वर्गे चोरी केलेचे कबुल केलने सदर गुन्हयाचे तपासकामी आ. क.१.२.३.८ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा ४०७ मॉडलचा टॅम्पो एम एच १२ सी टी ९००० हा जप्त करण्यात आला असुन गुन्हयात चोरी गेलेला १००००/- रू किंमतीचे ५ लोखंडी बर्गे तप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. . डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. . मिलिंद मोहिते सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सहा फौज महेश पन्हाळे, पो. हवा. महेंद्र फणसे, पो.हवा. रमेश नागटिळक, पो.हवा. सूर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामन खोमणे, पो.ना. भाउसाहेब मारकड, पो.शि. पोपट नाळे, अमोल भुजबळ, किसन ताडगे, आबा जाधव, विलास ओमासे चा.पो.ना. विजय शेंडकर होमगार्ड निलेश खामगळ, वैभव कुंभार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा फौज. महेश पन्हाळे हे करीत आहेत.