-->
संकष्टी चतुर्थी निमित्त मयुरेश्वरास दर्शनासाठी भावीकांची गर्दी

संकष्टी चतुर्थी निमित्त मयुरेश्वरास दर्शनासाठी भावीकांची गर्दी

मोरगाव :  अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्त मयुरेश्वर दर्शनासाठी राज्यभरातील भावीकांनी  रांगा लावल्या होत्या. पहाटे पाच वाजल्यापासून श्रींच्या दर्शनासाठी  भक्तांनी रांगा लावल्या असल्याने मोरगावला यात्रेचे स्वरूप आले असून रात्री उशीरापर्यंत साठ हजारांपेक्षा अधीक भावीक श्रींचे दर्शन घेतील अशी माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
 आज पहाटे  संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गुरव  मंडळींचे प्रक्षाळ पुजा  झाली. यानंतर श्रींचा मुख्य गाभारा  दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी सात वाजता सालकरी ढेरे  यांनी श्रींची पुजा केली.यानंतर देवस्थानच्यावतीने नैवद्य दाखविण्यात आला. आजची संकष्टी चतुर्थी  चौथ्या  शनिवारी  सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे आज शनिवार व उद्या रविवार सलग सुट्ट्यामुळे  भावीकांनी तुंबळ गर्दी केली आहे.  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई  आदी जिल्ह्यातून  भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले आहेत. अनेक भाविकांनी सलग सुट्टीमुळे अष्टविनायक यात्रेचे आयोजन केले आहे.
 सकाळी नऊ नंतर भावीकांचा ओघ आणखीनच वाढला. दुपारी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्रींची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर देवस्थानच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसाद सुरू करण्यात आला. आज होणारी गर्दी लक्षात घेता पेठेतील दुकाने हार, दुर्वा, फुले, पेढे  यांनी गच्च सजवली आहेत. 

भावीकांच्या झालेल्या गर्दीमुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने  मयुरेश्वर मंदिर शिखरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . सायंकाळी पाच नंतर परिसरातील भक्तांचा ओघ आणखी वाढला. आज होणारी संभाव्य गर्दी लक्षात  घेता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची आरती होणार असून महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article