
कसबा फलटण चौकात धुडगूस घालणाऱ्या गँगचा म्होरक्या अटक; बारामती पोलिसांची कारवाई
Tuesday, November 15, 2022
Edit
बारामती;- दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर ऋषिकेश चंदनशिवे तेजस बच्छाव यश जाधव यांनी फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज यामध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला यातील फिर्यादी याच्या डोक्यात 13 टाके पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऋषिकेश चंदनशिवे व तेजस बच्छाव यांना अटक केली होती. आदेश कुचेकर गुन्हा केल्यानंतर मुंबई येथे फरार झालेला होता. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. या सर्व आरोपींच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न खंडणी घराविषयी आगळीक व दंगल या भादवीच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
(307,384,427,143,147,149 सह अर्म act 4 25)आदेश कुचेकर व त्याची गॅंग या भागात वारंवार गुन्हे करते व त्यांच्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच. संघटित गुन्हेगारी थोपपवण्यासाठी करावी लागणारी कारवाई होणार आहे त्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार आहे. सदर आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सपोनी कुलदीप संकपाळ पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी केली आहे.