-->
काऱ्हाटी पाटी येथे रस्ता ओलंडणाऱ्या महीलेस अल्टो गाडीची जोरदार ठोस; महीला गंभीर जखमी

काऱ्हाटी पाटी येथे रस्ता ओलंडणाऱ्या महीलेस अल्टो गाडीची जोरदार ठोस; महीला गंभीर जखमी

मोरगाव : मोरगाव बारामती  या जिल्हा मार्ग क्र  ६५ वर  सातत्याने अपघात मालीका सुरुच आहे. आज  काऱ्हाटी पाटी येथे रस्ता ओलंडणाऱ्या  अंजना   जाधव  वय ५४ वर्षे या महीलेस अल्टो गाडीने जोरदार ठोस दिल्याने ही महीला गंभीर जखमी  झाली असल्याची घटना घडली 

 जेजुरी बारामती हा गुळगुळीत रस्ता  पादचारी व वाहनचालकांसाठी  मृत्यूचा सापळा बनला आहे. सिमलेस कंपनीनजीक काळाओढा  येथे एक  तर  फोंडवाडा येथे तीन   अशा एकूण चार व्यक्त्तींचा अपघाती  मृत्यू झाला असल्याच्या घटनेस अवघा   महीना  होत आहे . या घटना ताज्या असतानाच आज काऱ्हाटी पाटी येथे आज आठ वाजण्याच्या  दरम्यान अल्टो गाडी क्र एम एच १२ एल व्ही २४८० ने  रस्ता ओलंडणाट्या महीलेस जोरदार ठोस दिला . या  भिषण  अपघातात अंजना जाधव वय वर्षे  ५४ गंभीर जखमी  झाल्या आहेत.
स्थानिक नागरीकांच्या मदतीने महीलेला पुढील उपचारासाठी त्यांना  बारामती येथील खाजगी दवाखान्यात  दाखल केले आहे.  मोरगाव बारामती या रस्त्यावरील  मृत्यूची मालीका थांबण्यासाठी या रस्त्यावर असणाऱ्या गावच्या  ठिकाणी गतीरोधक करण्याची मागणी  स्थानिक ग्रामस्थांची आहे. मात्र राजकीय हट्टापायी  गतीरोधक होत नसल्याने ग्रामस्थांकडून तिव्र संताप व्यक्त होत आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article