
बारामती: तालुकास्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत तन्मय चांदगुडे प्रथम
Tuesday, November 29, 2022
Edit
मोरगाव :- खंडूखैरेवाडी ता . बारामती राजे प्रतीष्ठान संचलीत न्यु ईंग्लीश स्कुलच्या तन्मय गोपाळ चांदगुडे या विद्यार्थ्याने कुस्ती स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकविला आहे . यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . येथील राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कूलचा तन्मय चांदगुडे या दहावीच्या विद्यार्थ्याचा बारामती तालुकास्तरीय ग्रीको रोमन (कुस्ती ) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हा स्तरावर त्याची निवड झाली आहे. बोरजाई माता तालीम चांदगुडेवाडीचे प्रशिक्षक मोहन चांदगुडे यांकडे तन्मयने कुस्तीचा सराव केला आहे. राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडूखैरेवाडी च्या मुख्याध्यापिका मनिषा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे शारिरीक शिक्षणचे शिक्षक राहुल यादव सर , वैभव जराड सर ,खैरे सर , सुमित जगदाळे यांनी तन्मय ला मार्गदर्शन केले होते . राजे प्रतिष्ठान स्कुल खंडूखैरेवाडीतील विद्यालयातील सर्व शिक्षिकांनी तन्मय चे अभिनंदन केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलिप खैरे यांनी तन्मय चांदगुडे याला पुणे जिल्हा स्तरावर होणा- या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे कौतुक केले