-->
बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी  शेखर हिरामण खंडाळे

बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर हिरामण खंडाळे

बारामती तालुका कोतवाल संघटनेची आज बारामती येथे बैठक संपन्न झाली. यामध्ये  शेखर  हिरामण खंडाळे  यांची  संघटनेच्या अध्यपदी  तर  सोमनाथ  हनुमंत भोसले  यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते  निवड करण्यात आली . तसेच  शिपाईपदी  पदोन्नती झालेल्या कोतवालांचा  महसूल  व कोतवाल  संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कोतवाल संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष दशरथ खोमणे सह संघटनेतील  कोतवालांची  सेवा जेष्ठतानुसार शिपाईपदी  पदोन्नती झाली . यामुळे  आज बारामती येथे कोतवाल संघटनेची बैठक संपन्न झाली.  या बैठकीत अध्यक्षपदी  - शेखर हिरामण खंडाळे, उपाध्यक्षपदी सोमनाथ हनुमंत भोसले, 
खजिनदारपदी महादेव बबन आंबुरे, सचिवपदी  मोहन जगन्नाथ भिसे, कार्याध्यक्षपदी  पांचाली जगताप, 
सह कार्याध्यक्ष - वर्षा प्रदीप गावडे,  ज्येष्ठ सल्लागार - तानाजी आत्माराम जाधव, संपत भाऊसो खोमणे
कार्यकारिणी सदस्य - राहुल हरिश्चंद्र पोमणे, बाळासो अंकुश खोमणे,अनिता राजकुमार जाधव, शिवदत्त बाळासो चव्हाण, सचिन बाळासो निकम, हनुमंत जगन्नाथ थोरात,अक्षदा शैलेश नेवसे  यांची निवड करण्यात आली 

तसेच या बैठकीनंतर  बारामती तालुका तलाठी संघटना, बारामती महसूल कर्मचारी संघटनेच्या  वतीने   पदोन्नती झालेले कोतवाल  संतोष खोमणे,दीपक गायकवाड,सतिश मलगुंडे, रामदास खोत,महेश गोरे,ज्ञानदेव बनकर यांचा यथोचित सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.  यावेळी मंडळ अधिकारी एल.एस.मुळे,तलाठी संघटना अध्यक्ष रवी कदम,सचिव गजानन पारवे,महसूल संघटना अध्यक्ष मधुकर जाधव,तलाठी संघटना सदस्य विनोद धापटे,राहुल गुळवे व तालुक्यातील सर्व कोतवाल हजर होते 

      .

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article