
बारामती: मुर्टी येथील २ घरे चोरट्यांनी फोडली; ३० हजारांचा मुद्देमाल लंपास
Thursday, November 24, 2022
Edit
मोरगाव :- मुर्टी ता. बारामती येथील सोनवलकर वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी दोन घरांची घरफोडी केली असल्याची घट्ना मंगळवार दि २२ रोजी घडली. यामध्ये २५ ते ३० हजारांचाअ मुद्देमाल चोरीस गेला आहे .
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सातत्याने भुरट्या चोऱ्या व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे . तालुक्यातील मुर्टी नजीक सोनवलकर वस्ती येथे मंगळवारी अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये दरम्यान वस्तीवरील ग्रामस्थांची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. जनाबाई उत्तम सोनवलकर यांच्या घरातून अंदाजे २५ ते ३० हजार रुपयाची चोरी झाली आहे. यामध्ये पॅंटीच्या खिशातून ५००० रुपये , चांदीचे ब्रेसलेट , सोन्याचे मनी आणि काही दागिन्यांची चोरी झाली आहे.