-->
बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी दत्तात्रय आवाळे तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब मोरे

बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी दत्तात्रय आवाळे तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब मोरे

मोरगाव : बारामती तालुका खरेदी-विक्री संघाची  निवडणूक  २०२२-२७ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच  माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (विरोधी पक्षनेते) यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली होती. तर  आज दि ९  रोजी  अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दत्तात्रय रामभाऊ आवाळे व उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब चंदरराव मोरे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध संपन्न झाली.

 बारामती तालुका खरेदीविक्री संघाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली होती. त्यानंतर  आज बुधवार  दि. ०९ रोजी विरोधी पक्षनेते  अजितदादा पवारसो यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी चेअरमन पदासाठी दत्तात्रय रामभाऊ आवाळे रा.सावळ  यांची तर  व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब चंदरराव मोरे रा.अंजनगाव यांच्या नावाची घोषणा या बैठकीमध्ये केली.
सदरच्या निवडणुकीसाठी दोन पदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे सदरची निवड प्रकीया  बिनविरोध झाली. 

नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी संदीप जगताप, धनवान वदक, तानाजीराव खोमणे, दशरथदादा धुमाळ इ. मान्यवर उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article