
कुरणेवाडी येथे मतदानासाठी रांगा..दुपारी १ वाजेपर्यंत ६० % मतदान..मतदारांत अभूतपूर्व उत्साह
Sunday, December 18, 2022
Edit
कुरणेवाडी - कुरणेवाडी ग्रामपंचायत मतदानात मतदारांत अभूतपूर्व उत्साह दिसून आला असून दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ६० % च्या आसपास मतदान झाले होते.
सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी कुरणेवाडी ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. यासाठीचे मतदान आज रविवारी मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
ग्रामपंचायतीच्या स्थापने पासून ही ग्रामपंचायत कै गणपतराव जगताप यांच्या ताब्यात होती. यावेळी मात्र काळभोर गटाने एकत्र येत विरोधी पॅनल उभा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी वारूळ बाबा ग्रामविकास पॅनल व विरोधी वारूळ बाबा स्वाभिमान पॅनल यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. दोन्ही पॅनल कडून मतदारांना मतदान केंद्राकडे आणले जात आहे. मतदार ही मोठ्या उत्साहात मतदान केंद्राकडे येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी संदीप जगताप पाटील पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करणार की बदल होणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे..