
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का: कुरणेवाडी गावसह वाणेवाडी, पणदरे, वाघळवाडीतील निकाल धक्कादायक
Tuesday, December 20, 2022
Edit
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. माळेगावचे माजी चेअरमन तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली, मात्र सत्यजित जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने त्यांच्या गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली.
पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माजी उपसरपंच माणिक काळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदाच्या जागेसह १० पैकी १० जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले.
कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का बसला असून कुरणेवाडी काळभोर गटाने ६ विरूध्द २ जागांनी संदिप जगताप यांना काळभोर गटाने धक्का दिला आहे. हनुमंत काळभोर व सूर्यकांत काळभोर यांनी जगताप यांनी जगताप गटाला कडवे आव्हान दिल्याने गावच्या सरपंचपदी आशा किसन काळभोर या निवडून आल्या आहेत. येथे वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलने बाजी मारली आहे.
गडदरवाडीत सतिशभैय्या काकडे, प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर व लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलचा येथे पराभव झाला आहे.
वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार दिग्विजय जगताप यांच्या अपक्ष उमेदवार गीतांजली जगताप या निवडून आल्याने सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार विद्या भोसले यांचा पराभव झाला आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायतीत हेमंत गायकवाड हे सरपंचपदी निवडून आले.