
सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
Wednesday, December 21, 2022
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविध विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेतला.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल साळुंके यांच्या हस्ते झाले. यावेळी अविनाश सोनवणे, आनंद मोरे, महेंद्र कुतवळ, सारिका वाबळे, सुनीता सोरटे, भानुदास सोनवणे उपस्थित होते.
यावेळी लहान व मोठ्या गटाच्या कबड्डी, खोखो, क्रिकेट या सांघिक तर धावणे, लांब उडी, गोळाफेक अशा वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या. सर्व स्पर्धात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदीप जमदाडे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.