-->
अॅट्रोसिटी गुन्ह्यात बारामती न्यायालयाने दिलेल्या निकालावर उच्च न्यायालय धाव

अॅट्रोसिटी गुन्ह्यात बारामती न्यायालयाने दिलेल्या निकालावर उच्च न्यायालय धाव

इंदापूर प्रतिनिधी : 
           दि. २७/०३/२०१३ रोजी इंदापूर तालुक्यातील व्याहाळी गावचे हद्दीत दशरथ शंकर चितारे यांचे घरासमोर व परिसरात येवून तनपुरेवाडी या गावातील जवळपास १६ इसमांनी काठ्या, गज, कोयते इ. हत्यार घेऊन जातीवाचक शिवीगाळ करीत व महिलांशी अश्लील कृत्य करीत विकास चितारे, आप्पा चितारे, जावेद मुलाणी, वैशाली चितारे, सोफिया मुलाणी, शर्मिला चितारे, उर्मिला चितारे  या सर्वांना  बेदम मारहाण करून, जातीवाचक बोलत व महिलांवर हात टाकत विनयभंग केला. त्यासंदर्भात दि. २७/०३/२०१३ रोजी सचिन चंद्रकांत तनपुरे व इतर १५ यांचे विरूद्ध अॅट्रोसिटी कायद्यानुसार इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला. सदर गुन्ह्याचा निकाल जवळपास ११ वर्ष ३ महिन्यांनी लागला परंतू न्यायाचा समतोल या निकालात पाहावयास मिळाला नाही म्हणून सदर फिर्यादी यांनी निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल करणेसाठी धाव घेतली आहे.
        दि. ३०/०९/२०२२ रोजी सदर गुन्ह्याचा निकाल बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने जाहिर केला त्यामध्ये न्यायालयाने १६ आरोपींमधील केवळ २ आरोपींना म्हणजेच लहु धुळेश्वर तनपुरे व सुरेश सर्जेराव तनपुरे यांना दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रूपये दंड आकारून सदर शिक्षा दिली आणि दुसऱ्या बाजूस उर्वरित इतर सचिन चंद्रकांत तनपुरे, सर्जेराव रामचंद्र तनपुरे, अनिल चांगदेव तनपुरे, अजिनाथ धुळेश्वर तनपुरे, अतुल धुळेश्वर तनपुरे, हरी सर्जेराव तनपुरे, सतिश दामोदर तनपुरे, रोहिदास दामोदर तनपुरे, ज्ञानदेव चांगदेव तनपुरे, सोमनाथ अर्जुन चोरमले, संजय मारूती तनपुरे, सोमनाथ चंद्रकांत तनपुरे, सचिन पंडित माने, महावीर सदाशिव तनपुरे या १४ आरोपींना दोषी धरून तथा २ वर्षाच्या चांगल्या वर्तनुकीवरती बॉन्ड घेऊन सोडण्यात आले.
        त्यामुळे सदरचा निकाल हा आमच्यावरती अन्यायकारक आहे, न्यायालयाने न्यायाचा समतोल न राखता निकाल दिला आहे, आम्हास योग्य तो न्याय मिळाला नाही. सर्व आरोपींना शिक्षा देणे हे न्यायाच्या दृष्टीने योग्य व गरजेचे होते परंतू तसे घडले नाही म्हणून मा.उप-विभागीय पोलिस अधिकारी इंगळे साहेब यांनी दिलेल्या पत्रान्वये व सरकारी वकिल अॅड प्रसन्न जोशी यांच्या मार्फत दि. १४/१२/२०२२ रोजी सदर अपिल प्रस्ताव मा. सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांना बारामती येथून पाठविण्यात आला आहे. अशी माहिती फिर्यादी विकास चितारे व साक्षीदार दशरथ चितारे, जावेद मुलाणी व विवेक चितारे यांनी दिली

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article