-->
बारामती शहर व एमआयडीसी परिसरात तोडफोड करणाऱ्या गॅंगवर तीन दरोड्याचे व खुनाचा प्रयत्न चे गुन्हे दाखल, दोन आरोपी जेरबंद

बारामती शहर व एमआयडीसी परिसरात तोडफोड करणाऱ्या गॅंगवर तीन दरोड्याचे व खुनाचा प्रयत्न चे गुन्हे दाखल, दोन आरोपी जेरबंद

काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान एमआयडीसी भागात कामाला बारमध्ये तोडफोड करून. आरोपी चेतन कांबळे ,विशाल माने, चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे ,एक अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालक  यांनी आपला मोर्चा श्रॉफ पेट्रोल पंपाकडे पाटस रोडला वळवला. त्या  ठिकाणी वरील सहा जणांनी दोन मोटरसायकल मध्ये दोन हजार रुपयांचे पेट्रोल टाकले त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या विक्रम पवार या कामगारांनी त्यांना पैसे मागितले असता ते पैसे न देता त्याच्यावर कोयता व तलवारी वार करत असताना  त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबलेले गणेश चांदगुडे यांनी त्यांना समज देत असताना वरील सर्वांनी त्यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले त्या ठिकाणी दोन हजार रुपयाची फुकट पेट्रोल बळजबरीने टाकून घेऊन पैसे दिले नाही व यांना जखमी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे.

त्यानंतर सदरचे टोळके टीसी कॉलेज परिसरात गेले त्या ठिकाणी टीसी कॉलेजच्या समोर असणाऱ्या बिल्डिंग मधील गळ्यातील फिर्यादी सुहास वरुडे यांच्या पॉर्न स्नेक सेंटर.कॅफेमध्ये तोडफोड केली व या कॅफेतील कामगार अमरीश राम लखन चौधरी याचे मानेवर जीवे मारण्यासाठी वार करत असताना तो चुकवत असताना  त्याच्या हाताला गंभीर जखमा झाले. तसेच आपले रेस्टॉरंट व पॉकेट कॅफे हॉटेलमध्ये सुद्धा तोडफोड केली  व समोर उभे असलेल्या दोन चार चाकी गाड्यांचा चक्कासुर केला तोडफोडीत हॉटेल व गाड्यांचे मिळून अंदाजे दोन लाखाचे नुकसान केले व गल्ल्यातील 4200 रुपये घेऊन गेले म्हणून त्याही ठिकाणी दरोडा व खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
सदरच्या आरोपींच्या मागावर तात्काळ बारामती शहर पोलिसांचे पथके लागली शहरांमध्ये त्यांनी नशेमध्ये परत काही अनुचित प्रकार करू नये म्हणून संपूर्ण शहरात  पेट्रोलिंग अलर्ट करण्यात आली .सदर आरोपी पैकी एक विधी संघर्ष ग्रस्त बालक ,चिराग गुप्ता ,प्रथमेश मोहरे  यांना राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पळून जात असताना पकडण्यात आले. या सर्व आरोपींवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुद्धा दरोडेचा गुन्हा दाखल झालेला आहे . चेतन कांबळे विशाल माने शामवेल उर्फ गोट्या जाधव हे त्या ठिकाणावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ,परंतु त्यांच्याही मागावर पथक असून त्यांच्या सुद्धा मुसक्या काही वेळातच आवळण्यात येणार आहेत . बारामती तालुका पोलिसांनी बारमध्ये तोडफोड केल्यावर लगेच दोन आरोपी अनिश सुरेश जाधव वय वीस वर्ष राहणार प्रगती नगर तालुका बारामती जिल्हा पुणे
 पियुष मंगेश भोसले वय 19 वर्ष राहणार  पवार बंगला आमराई तालुका बारामती जिल्हा पुणे अगोदरच पकडलेले आहेत. त्यांना पकडल्यानंतर दारूच्या नशेत हे बाकी सहा जण शहराकडे आले व त्यांनी श्रॉफ पेट्रोल पंप व टीसी कॉलेज समोर तोडफोड करून दहशत केली 

यातील बरेचसे युवक हे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे आहेत. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य वाईट संगतीच्या मुलांबरोबर व विधी संघर्ष ग्रस्त बालकां ना बरोबर केलेले आहेत सुशील मीडियातील मेसेज व रिल्स व्हिडिओ पाहून त्यांनीही हिरोपंती केली आहे .परंतु त्यांचे हे कृत्य त्यांना खूप महागात पडून कारागृहाची हवा खाण्यास भाग पाडले आहेत. कायद्याचा वचक हीच त्यांना आता शिक्षा आहे. 
बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची माहिती खालील प्रमाणे

विधी संघर्ष ग्रस्त बालक  वय सतरा वर्ष शिक्षण चालू बारावी कॉमर्स आई भोईटे हॉस्पिटल मध्ये मजुरी करते वडील आजारी यापूर्वीसुद्धा एका गुन्ह्यात सहभाग. दारू पिण्याची सवय

2 चिराग नरेश गुप्ता वय 19 वर्ष शिक्षण एस वाय बी कॉम टीसी कॉलेज बारावीपर्यंत शिक्षण पंजाब मध्ये झाले . मूळचा पंजाबचा भाऊ त्याचा पूर्वी चॉकलेट कंपनीत कामाला होता म्हणून शिक्षणासाठी इथे आला आता बजाज फायनान्स मध्ये पुण्याला काम करतो परीक्षा देण्यासाठी आला होता वाईट संगतीच्या मुलाबरोबर हा गुन्हा केला नशा पाणी करतो

3. प्रथमेश विश्वनाथ मोहरे वय 19 वर्ष शिक्षण बी फार्म शारदानगर कॉलेज वडील महाविद्यालयामध्ये प्रोफेसर बहिणी उच्चशिक्षित डॉक्टर नशे मध्ये गुन्हा  केला.
या सर्व महाविद्यालयीन लोकांनी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानसिकतेतून दहशत करण्यासाठी तोडफोड केली माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या सर्व दहशत पसरणाऱ्या लोकांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सांगितले त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे स्वतः बारामती शहरात येऊन त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना तात्काळ या गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले व गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यास सांगितले . त्यांच्या या प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत पसरवल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ भादवी कलम 395 307 397 34 प्रमाणे फिर्यादी नोंदवल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे उमेश दंडिले कुलदीप संकपाळ तपास पथकातील दशरथ कोळेकर अशोक सिताप तुषार चव्हाण दशरथ इंगवले शाहू राणे  राऊत देवकर दळवी यांच्या पथकाने तात्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला व वरील तिघांना राजगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये ताब्यात घेतले. 

सदर इस्मानी केलेल्या कृत्याची बातमी बारामती मध्ये सामाजिक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्याने लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून स्वतः अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी शहर पोलीस स्टेशनच्या स्टाफसह संपूर्ण शहरात रात्री उशिरापर्यंत गस्त करून आरोपी नशेमध्ये असल्याने  अनुचित प्रकार होऊन नये म्हणून काळजी घेतली. टीसी कॉलेज व श्रॉफ पेट्रोल पंप तोडफोडीची  ची माहिती मिळाल्यानंतर पाच मिनिटाच्या आत सर्व स्टाफ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचला.
या पुढे  प्रगती नगर वसंत नगर श्रीराम नगर अमराई टीसी कॉलेज या परिसरात हॉटस्पॉट ची माहिती काढून व गोपनीय माहिती गोळा करून या प्रकारे वाईट प्रवृत्तीकडे जाणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांचा समाज प्रबोधन व तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम याही पुढे तीव्र केली जाईल. 
शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांची सुरक्षा याला सर्वोत्तम प्राधान्य देऊन दहशतीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यापुढे गय केली जाणार नाही कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article